मुंबई: शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षातील संघर्षाला आता सुरुवात झाली आहे.  शिवसैनिकांनी भाजपा नगरसेविका आणि शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षा रितू तावडे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

रितू तावडे यांनी घाटकोपरच्या वार्ड क्र. 127 इथं हळदी कुंकू कार्यक्रमात सोन्याची नथ, साडी आणि भांडी देऊन आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

दरम्यान, अद्याप माजी उमेदवारी निश्चित झालेली नाही, तसंच मी या कार्यक्रमाची आयोजकही नव्हते, असं स्पष्टीकरण रितू तावडे यांनी दिलं आहे.
शिवसेना-भाजपची युती तुटली, महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर लढणार

‘राज्यातील सर्व महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका यापुढे स्बळावर लढणार.’ अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल गोरेगावात केली. गोरेगावच्या पदाधिकारी मेळाव्यात हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये आणि जयघोषामध्ये ही घोषणा करण्यात आली.

संबंधित बातम्या
युती तुटताच भाजपची शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी

शिवसेना-भाजपची युती तुटली, महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर लढणार

...म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यानंतर उद्धव ठाकरेंना फोन केला नाही: सूत्र

युती तुटताच भाजपची शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी



निवडणुकांची रणधुमाळी आजपासून, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

युतीच्या काडीमोडनंतर उमेदवारीसाठी सर्वपक्षीय मातोश्रीवर