मुंबई: महाराष्ट्र सरकारच्या नव्या टॅक्सी धोरणाविरोधात ओला-उबेर टॅक्सी चालकांनी आज मुंबईत संप पुकारला आहे. गेल्या आठवड्यात परिवहनमंत्री दिवाकर रावतेंनी 2017 चं टॅक्सी धोरण जाहीर केलं होतं. मात्र, हे धोरण काळ्या-पिवळ्या टॅक्सीचालकांच्या बाजूनं असल्याचा आरोप ओला-उबरवाल्यांनी केला आहे.

राज्यातील प्रवाशांना किफायतीशिर, तसेच सुरक्षित प्रवासाची साधने उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन विभागाकडून अॅप आधारित टॅक्सी सर्व्हिसेसना काही दिवसांपूर्वी नवीन नियमावली जाहीर केली होती.

महाराष्ट्र टॅक्सी नियम 2017नुसार, ज्या शहरात ओला, उबेर टॅक्सींना व्यवसाय करायचा असेल, त्याची नोंदणी करणे अनिवार्य असेल. विशेष म्हणजे अॅपवर आधारित असा स्वतंत्र परवानाही देण्यात येणार आहे.

सरकारच्या नियमानुसार सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओला, उबेर टॅक्सींचं किमान आणि कमाल भाडं सरकार ठरवणार आहे.

महाराष्ट्र टॅक्सी नियम 2017’मुळे काय होईल?

  • ज्या शहरात व्यवसाय करायचा असेल, त्याची नोंदणी आवश्यक


 

  • अॅपवर आधारित टॅक्सी असा स्वतंत्र परवानाही देण्यात येईल. मात्र, या टॅक्सी वातानुकूलित असतील.


 

  • या टॅक्सी स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या असतील.


 

  • या टॅक्सीमध्ये किंवा टॅक्सीच्या वाहन चालकाकडे GPS/GPRS यंत्रणा असेल, तसेच टॅक्सीत अंतर, मार्ग आणि भाडे दर्शवणारा डिस्प्लेही असेल.


 

  • सध्याच्या काळी-पिवळी टॅक्सीही अॅपवर आधारित टॅक्सी चालवता येईल. मात्र, गर्दीच्या वेळी अॅपवर आधारित आणि कमी गर्दीच्या वेळी मीटरवर, अशी टॅक्सी चालवता येणार नाही.


 

  • प्रवासाचे भाडे सरकारकडून किमान आणि कमाल पद्धतनीने निश्चित करुन देण्यात येईल.


 

  • टॅक्सीच्या स्वरुपानुसार भाड्याचे दर वेगवेगळे असतील.


 

संबंधित बातम्या: