मुंबई विमानतळावर दोघींना अटक, 16 लाखांचा मुद्देमाल जप्त
एबीपी माझा वेब टीम | 19 Oct 2016 01:20 PM (IST)
मुंबई : मुंबई विमानतळावर कस्टम विभागानं कारवाई करत दोन महिलांना अटक केली आहे. मीरा रोडला राहणाऱ्या दोघींकडून तब्बल 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मीरा रोडच्या शिवांगी पाटोदिया आणि शिवानी राज या दोघी मंगळवारी रात्री बहारिनहून आल्या. गल्फ एअरच्या विमानाने त्या मुंबई विमानतळावर उतरल्या. त्यानंतर तपासणीदरम्यान कस्टम विभागाने ही कारवाई केली. शिवांगी पाटोदियाने 423 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घातले होते, त्यावर बुरखा पांघरला होता. दोघींकडून जवळपास 14.39 लाख किमतीचं 520 ग्रॅम सोनं, 1.77 लाख किमतीचे चार सॅमसंगचे फोन आणि 1 आयफोन असा 16.16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.