मुंबई : पोलीस खात्यातुन दोन पोलीस हवालदारांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. या दोघांविरूद्ध विभागीय चौकशीत ही बाब लक्षात आली की, दोघे आठ वर्षे हा दीर्घकाळ ड्युटीवर गैरहजर राहिले आणि तरी सरकारी नोकरीचा लाभ घेत होते. त्यांच्या कर्तव्यावर लांबणीवर पडलेल्या अनुपस्थितीचे औचित्य सिद्ध करण्यासाठी विभागीय चौकशीतही दोघे हजर झाले नाहीत आणि त्यानंतर त्यांना पोलीस दलातून काढून टाकण्यात आले.


मलबार हिल पोलीस ठाण्यात संलग्न असलेले पोलीस हवालदार रामलाल मंजुळे आणि समद शेख यांना मुंबई पोलीस (दंड व अपील) नियम 1956 च्या नियम-3 अंतर्गत पोलीस परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त राजीव जैन यांनी बरखास्त केले.


जून 2012 मध्ये मंजुळे यांची तारदेओ स्थानिक शस्त्रास्त्र विभागातून मलबार हिल पोलीस ठाण्यात बदली झाली होती, परंतु मागील पदावरून मुक्त केल्या नंतर ही मंजुळे मलबारहिल पोलिस ठाण्यात हजार झाले नाही.यासंदर्भात त्यांना अनेक स्मरणपत्रे व सूचना पाठविण्यात आल्या परंतु त्या व्यर्थ ठरल्या.कोणतीही परवानगी न घेता आठ वर्षाहून अधिक काळ ते कर्तव्यावर गैरहजर राहिले. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मंजुळे यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली होती, परंतु त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कॅम्पसमध्ये फिरण्यासाठी येणाऱ्यांकडून एन्ट्री फी घेण्याचा निर्णय लागू होण्यापूर्वीच स्थगित 


त्याचप्रमाणे शेखदेखील आठ वर्षांपासून अनुपस्थित राहिले व त्याने मलबार हिल पोलीस ठाण्यात कर्तव्याची नोंद केली नाही.  या वर्षी मार्चमध्ये जेव्हा त्यांना अंतिम कारणे दाखवा नोटीस दिली गेली तेव्हा त्याने त्या नोटिसला उत्तर दिले आणि अनुपस्थित राहण्याचे कारण स्पष्ट केले. परंतु स्वताच्या बचावासाठी त्यांनी दिलेली कारणे समाधानकारक नव्हती आणि म्हणून त्यांची बरखास्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती एका अन्य अधिकाऱ्यांनी दिली.


दोन्ही पोलीस कर्मचारी इतकी वर्षे सरकारी नोकरीचे विविध फायदे घेत राहिले, ड्युटीवर हजर होण्यासाठी वारंवार नोटीस देऊन ही त्या नोटीसकडे दुर्लक्ष करत राहिले, जेव्हा डिपार्टमेंटल इन्क्वायरी बसवली त्यावेळी सुद्धा मंजुळे यांनी त्याला उत्तर दिले नाही तर शेख यांचं उत्तर समाधानकारक नव्हते आणि म्हणून या दोघांना पोलीस सेवेतून बरखास्त करण्यात आल्याची माहिती एका पोलिस सूत्रांनी दिली. मुंबई पोलीस दल हे  एक आणूशासन असलेला पोलिस दल आहे आणि अश्या पोलिस दलात मध्ये अशा प्रकारचे गैरवर्तन ही गंभीर बाब आहे.