चंद्रपुरात दोन महिन्याचं बाळ चोरीला
एबीपी माझा वेब टीम | 09 Dec 2018 04:17 PM (IST)
आर्यन साव असं चोरीला गेलेल्या बाळाचं नाव आहे चंद्रपूर शहरातील हिंगलाज भवानी परिसरात हे कुटुंब वास्तव्यास आहेत. बाळाला चोरी करुन घेऊन जाणारी महिला सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातून दोन महिन्याचं बाळ चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आर्यन साव असं चोरीला गेलेल्या बाळाचं नाव आहे. चंद्रपूर शहरातील हिंगलाज भवानी परिसरात हे कुटुंब वास्तव्यास आहेत. बाळाला चोरी करुन घेऊन जाणारी महिला सीसीटीव्हीत कैद झाली आहे. एक अनोळखी महिला काल दुपारी साव यांच्या घरी आली. बाळाच्या आईला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याच्या बहाण्यानं जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन गेली. तिथं काही वेळानं बाळाला डॉक्टरला दाखवायचं असं सांगून महिला बाळाला घेऊन पसार झाली. बाळाच्या हे आईला लक्षात येताच तिने पोलीस स्टेशन गाठले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच पोलिसांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये असलेले CCTV फुटेज ताब्यात घेतले असून त्याआधारे पोलीस आरोपी महिला आणि बाळाचा शोध घेत आहेत.