मुंबई : मुंबईतील गोरेगावमध्ये बांधकाम सुरु असलेली दुमजली इमारत कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण जखमी झाले आहेत. जुन्या घराच्या जागेवर दुरुस्तीचे बांधकाम सुरू असतांना ही घटना घडली.
गोरेगावच्या मोतीलाल नगर परिसरातील घरांवर अनाधिकृतपणे दोन मजले बांधले जात होते. बांधकाम सुरु असलेली इमारत सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळली. यावेळी घरात एकूण 11 कामगार आणि त्यांचे कुटुंबिय काम करत होते.
इमारत कोसळ्याने हे सर्व जण कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. इमारत कोसळल्याचा मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या परिसरातील लोकांना घटनस्थळी धाव घेतली. स्थानिकांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 9 जणांना बाहेर काढलं. दरम्यान एका कामगाराचा तेव्हाच मृत्यू झाला होता.
काही वेळातच एडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरु झाला. एनडीआरएफच्या जवानांना दोन कामकारांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. मृतांमध्ये 27 वर्षीय रमन कुमार आणि इतर दोन जणांचा समावेश आहे.