मुंबईः लोकलमध्ये कॅन्सर पीडितांच्या नावाने मदत मागणाऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे. कॅन्सर पीडितांच्या नावाने आर्थिक मदत मागून पैसे खिशात भरणाऱ्या दोघांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघेही एनजीओ उम्मीद फाऊंडेशनसाठी काम करतात.


 

जमा केलेले पैसे दोघेही साहिल कुकरेजा नावाच्या व्यक्तीकडे जमा करायचे. या दोघांनाही 7 ते 10 हजार रुपये मिळत होते.जितेंद्र देशमुख नावाच्या व्यक्तीने यासंदर्भात रेल्वे पोलिसात तक्रार केली होती. चौकशी केल्यानंतर उम्मीद संस्थेकडून जमा केले जाणारे पैसे कॅन्सर पीडितांना मिळत नसल्याचंही पुढं आलं आहे.

 

लोकलमध्ये कॅन्सर पीडितांना मदत करण्याच्या बहाण्याने भावनिक साद घालून अनेक तरुण-तरुणी प्रवाशांकडून पैसे जमा करायचे. मात्र प्रत्यक्षात या लोकांकडून प्रवाशांची लूट केली जात आहे. लोकलमध्ये पैसे मागणाऱ्यांच्या काही टोळ्या अजूनही सक्रिय असण्याचा अंदाज आहे.