संजय राऊतांनी मोदी आडनावाला केंद्रस्थानी ठेऊन ट्वीट करताना म्हटलंय की, “पैसे बँकेत ठेवले तर नीरव मोदीची भीती आहे. तर घरात ठेवाले तर नरेंद्र मोदींची”
संजय राऊत यांच्या ट्वीटला आशिष शेलारांनी तिखट शब्दात उत्तर दिलं आहे. “प्रभादेवीच्या गल्लीत काहींना ‘मोदी’ शब्दाशी यमक जुळवून काहींना काव्य सुचले. तेव्हाच कळले की, शिमगा जवळ आला आहे. तसा वर्षभर यांचा शिमगाच असतो म्हणा. पण उगाच यमकासाठी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू न,का ती थुंकी तुमच्याच तोंडावर पडेल.”
दरम्यान, भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र असले, हे दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नीरव मोदी प्रकरणावरुन काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे. त्यात शिवसेनेचीही भर पडली आहे.
दुसरीकडे शिवसेनेचं मुखपत्र आजच्या सामनातूनही नीरव मोदीलाचा रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा, असा खोचक सल्ला दिला आहे.