ठाणे : ‘ठाणे-मुंब्रा मार्गावरची दुरुस्ती जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत या मार्गावरील सगळी टोल वसुली बंद करा.’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.


ठाणे-मुंब्रा रस्ता येते २ महिने वाहतुकीसाठी बंद असणार आहे, त्यामुळं ही वाहतूक शिळफाटा आणि ऐरोली रस्त्यानं वळवण्यात आली आहे. मात्र, यामुळं प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे. हेच पाहता जितेंद्र आव्हाड यांनी ही मागणी केली आहे.

'सोमवारपर्यंत मुख्यमंत्र्यांनी टोल वसुली बंद केली नाही तर आपण रस्त्यावर उतरुन टोल वसुली बंद पाडू.' असा इशाराही आव्हाडांनी दिला.

जितेंद्र आव्हाड यांच्या या इशाऱ्यानंतर राज्य सरकार याबाबत नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.