Tunisha Sharma Case : अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी अभिनेता शीझान मोहम्मद खानचे कुटुंबीय आणि वकील यांच्या वतीने सोमवार 2 जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. यादरम्यान शीजान खानची बहीण आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री फलक नाज आणि शफाक यांनी अनेक खुलासे केले आहेत. यासोबतच फलक तुनिषा शर्माच्या आईचा आरोपही फेटाळला आहे, ज्यात तिने हिजाब परिधान करून उर्दू शिकवण्याबाबत म्हटले होते. तसेच त्यांनी तुनिषाची आई आणि तिचा मामा यांच्यावर थेट आरोप केले आहेत.
तुनिषा आत्महत्येप्रकरणी तुनिषाची आई बनिता शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन शीझान आणि त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. शीझानचं तुनिषाच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचं म्हणत, कुटुंबाने ही त्याला साथ दिल्याचा आरोप केला होता. 31 डिसेंबरला शीझानला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी झाल्यावर शीझानचे वकिल शैलेंद्र मिश्रा यांनी आपण 2 जानेवारीला पत्रकार परिषद घेऊन सिक्रेट ग्रिलफेंड का सिक्रेट बॉयफ्रेंड, याबाबत खुलासा करणार असल्याचं सांगितलं होत. आज शीझानची आई, त्याची बहिणी आणि वकिलांनी पत्रकार परिषद घेत तुनिषाचे तिच्या आईशी चांगले संबंध नसल्याचा आरोप केला आहे. तुनीषाला टॅटू काढण्यासंबधी किंवा कुत्रा पाळण्यासंबंधी कोणतीही सक्ती केली नसल्याचं शीझानच्या कुटुंबांनी सांगितलं. उलट तुनिषा आपल्या आईचे फोन घ्यायची नाही, फोनच फेकून द्याची, असा आरोप त्यांनी केला आहे. तर पवन शर्मा जे स्वतःला तुनिषाचे मामा असल्याचे सांगतात, ते तुनिषाचे मामा नसून तिचा पूर्वाश्रमीचा मॅनेजर असल्याचा गौप्यस्फोट यावेळी केला. तुनिषा या आधी दोन रिलेशीनशीपमध्ये असल्याची माहीत शीझानच्या वकिलांनी दिली. तर तुनिषा आणि शीझान चांगेल मित्र होते. त्यांचा कधीच ब्रेकअप झाला नाही, ब्रेकअपचा मुद्दा चुकीचा आहे. कायद्याचा गैरवापर होत असल्याचा आरोप शीझानच्या वकिलांनी केला आहे. शीझानची कुणीही सिक्रेट मैत्रीण नसल्याच स्पष्टीकरण ही शीझानच्या वकिलांनी यावेळी दिलं आहे.
तुनीषा शर्माचे वकील यांनी आपली बाजू मांडत शीझानच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपाचे खंडन केलं आहे. त्यांच्यावरच मानहानीचा दावा टाकणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शीझानच्या कुटुंबियांनी तुनिषाच्या आत्महत्येविषयी काही ही सांगितलं नाही. यात फक्त मामा कोण, आईचे रिलेशन कसे होते, याबाबत सांगितलं आहे.