तुकाराम मुंढेंच्या 'वॉक विथ कमिशनर' उपक्रमाला जोरदार प्रतिसाद
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 05 Nov 2016 01:55 PM (IST)
नवी मुंबई : नवी मुंबईत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी सुरु केलेल्या 'वॉक विथ कमिशनर' उपक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. नेरुळमध्ये आज झालेल्या रॅलीत सर्वसामान्य नागरिकांनी आयुक्तांना निवेदन देण्यासाठी मोठी गर्दी केली. आयुक्तांनी नेरुळकरांच्या समस्यांचं निवेदन स्वीकारुन त्वरीत कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. नियमात राहूनच यापुढेही लोकांसाठी काम करणार असल्याचा निर्धार यावेळी तुकाराम मुंढेंनी बोलून दाखवला. दरम्यान तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईमुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात मोर्चा उघडत अविश्वास ठराव मंजूर केला. मात्र या ठरावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे.