या अविश्वासाच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने मतदान केलं. तर भाजपने तुकाराम मुंढे यांच्या बाजूने मतदान केलं.
महापालिकेच्या कामकाजाला दुपारी सव्वा बाराच्या सुमारास सुरुवात झाली. यावेळी स्वत: तुकाराम मुंढे उपस्थित होते.
त्याआधी सुमारे 25 दिवसांनी महापौर सुधाकर सोनवणे हे महापालिकेत दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अविश्वास ठरावाच्या बाजूने आहेत, तर भाजपचा याला विरोध आहे. शिवसेनेत दोन मतं आहेत.
अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी अनिश्चित काळासाठी सुट्टी घेतल्याची चर्चा आज नवी मुंबईमध्ये होती. पण सकाळी साडे नऊ वाजताच कार्यालयात दाखल होत तुकाराम मुंढे यांनी या अविश्वास ठरावाला सामोरे जाणार असल्याचं सूचित केलं.
आजच्या अविश्वास ठरावाबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी आग्रही होती, शिवेसेनेचे काही नगरसेवकही या अविश्वासाच्या बाजूनं होते, मात्र उद्धव ठाकरे यांनी अद्याप याबाबत ठोस निर्णय घेतलेला नव्हता.
तुकाराम मुंढेंवरील आरोप
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर महापौर, नगरसेवक, लोकप्रतिनिधींचा अवमान करणे, महासभेत धोरणात्मक प्रस्ताव न आणता परस्पर निर्णय घेणे, स्थायी समितीच्या निर्णयावर गदा आणणे, आदी आरोप ठेवण्यात आले आहेत.
असं असलं तरी सर्वसामान्य मुंबईकर मात्र तुकाराम मुंढे यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत.नवी मुंबईकरांनी मुंढेंना वाचवण्यासाठी ‘सेव्ह तुकाराम मुंढे’ मोहीम सुरु केली आहे. वाशी रेल्वे स्थानकाजवळ नवी मुंबईकरांनी एकत्रित येऊन ‘वॉक फॉर आयुक्त’ हे अभियान राबवलं गेलं. यावेळी ‘संडे हो या मंडे, आयुक्त हवेत मुंढे’ असे फलक हाती घेऊन, तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या गेल्या. त्यामुळे वादामध्ये कुणाची सरशी होणार हे येत्या काळातच स्पष्ट होईल.
संबंधित बातम्या
सुट्टीवर जाणार नाही, तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण
‘संडे हो या मंडे, आयुक्त हवेत मुंढे’; तुकाराम मुंढेंसाठी नवी मुंबईकर रस्त्यावर
तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव, शिवसेनेत दोन मतप्रवाह
आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव
…तर तुकाराम मुढेंविरोधात हक्कभंग आणू : मंदाताई म्हात्रे
तुकाराम मुंढेंनी नवी मुंबई आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला!
नवी मुंबईकरांच्या समस्या जाणण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम
नवी मुंबईतील 20 झुणका भाकर केंद्र सील, आयुक्त तुकाराम मुंढेंची कारवाई
तुकाराम मुंढेंचा नवी मुंबईत धडक कारवाई, 6 कामचुकार अधिकाऱ्यांचं निलंबन