मुंबईत एका शिक्षकाकडून दुसऱ्या शिक्षकाची हत्या
एबीपी माझा वेब टीम | 02 Feb 2018 08:44 AM (IST)
मुंबईतील मालाड मालवणी परिसरात एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना काल (गुरुवार) रात्री घडली.
आरोपी शिक्षक
मुंबई : मुंबईतील मालाड मालवणी परिसरात एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना काल (गुरुवार) रात्री घडली. आपल्या ट्युशन क्लासमधील मुले दुसऱ्या ट्युशन क्लासमध्ये शिकायला गेल्याच्या रागातून एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाची हत्या केल्याच्या प्रकार घडला आहे. मालाड मालवणी परिसरातील अबुजवाडीमध्ये विजय नावाच्या शिक्षकाचा खासगी क्लास आहे. त्याच्या क्लासमधील इतर शिक्षकांनी समोरच असणाऱ्या अरुप बिश्वास यांच्या क्लासमध्ये शिकवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे त्याच्या क्लासमधील अनेक मुलं ही अरुप यांच्या क्लासमध्ये जात होती. याच रागातून विजयने काल अरुप बिश्वास यांच्यावर धारधार चाकूने वार केले. दरम्यान, अरुप यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.