मुंबई : जनतेतून थेट निवडून आलेल्या सरपंचांचा 'सरपंच दरबार' मंत्रालयात आयोजित करण्यात आला होता. मात्र या दरबारात पत्नी सरपंचांबरोबर आलेल्या पतीराजांची गर्दी झाल्यामुळे पती सरपंचांना बाहेर काढण्याची वेळ आली.
सरपंच पतीराजांना बाहेर काढण्याची पाळी मंत्रालयातील पोलिस कर्मचाऱ्यांवर आली. त्यामुळे सरपंच परिषदेसाठी आलेल्या सरपंच पतिराजांनी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर गोंधळ घातला.
वाढता गोंधळ पाहून खुद्द ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी निरोप पाठवून महिला सरपंचाच्या पतिराजांना आपल्या केबिनमध्ये बसू देण्यास सांगितलं. त्यानंतर सभागृहाबाहेर सुरु असलेला गोंधळ आवरण्यात पोलिसांना यश आलं.
राज्यातील नवनिर्वाचित आणि पूर्वीच निवडून आलेल्या 150 सरपंचाना या दरबारासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात 200 सरपंच आल्यामुळे सभागृहात जागा अपुरी पडायला लागली. त्यामुळे सरपंच पतिराजांना बाहेर काढण्याची वेळ पोलिसांवर आली होती.
सरपंच दरबारात पत्नी सरपंचासोबतच्या पतिराजांचा गोंधळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Feb 2018 10:41 PM (IST)
वाढता गोंधळ पाहून खुद्द ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी निरोप पाठवून महिला सरपंचाच्या पतिराजांना आपल्या केबिनमध्ये बसू देण्यास सांगितलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -