तृप्ती देसाईंनी मजार प्रवेशसाठी जबरदस्ती केल्यास काळं फासू असं इशारा एमआयएमने दिला आहे.
यापूर्वी शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांनी तृप्ती देसाईंच्या महिला प्रवेशाच्या भूमिकेला विरोध केला होता.
मात्र, आज आम्ही दर्ग्यातल्या मजारमध्ये प्रवेश न करता जिथंपर्यंत महिला जातात, तिथपर्यंतच जाऊ,असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे. त्यामुळे जर तृप्ती देसाई मजारमध्ये जाणार नसतील, तर आमचाही त्यांना विरोध नाही, असंही अराफत शेख यांनी म्हटलं होतं.
मात्र आता महिलांना पुरुषांप्रमाणेच दर्शन घेता यावं, अशी मागणी तृप्ती देसाईंची आहे. या सर्व प्रकारामुळे या आंदोलनावरुन वादाची शक्यताही नाकारता येत नाही.
2011 पासून दर्ग्यात महिलांना प्रवेशबंदी
मुंबईतील हाजी अली दर्ग्याला फक्त मुस्लिमच नव्हे तर हिंदू भक्तही पवित्र स्थान मानतात. त्यामुळेच मुस्लिम धर्मीयांबरोबरच इथे हिंदू धर्मीयही मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. मात्र इथे 2011 पासून महिलांना प्रवेश बंदी केली आहे.
15 व्या शतकात उभ्या राहिलेल्या या दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश नाकरताना दर्गा ट्रस्टने अजब युक्तीवाद केला आहे. दर्ग्याच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देणं हे इस्लामच्या विरोधात आहे. ते घोर पाप आहे, असं म्हणत, ट्रस्टने 2011 मध्ये महिलांना दर्गाबंदी केली.