मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दोन ट्रक आणि खासगी बसची धडक
एबीपी माझा वेब टीम | 23 Apr 2017 08:49 AM (IST)
रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर दोन ट्रक आणि खाजगी बसमध्ये अपघात झाला आहे. या अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू झाला असून बसचालक आणि ट्रकचा क्लीनर जखमी झाले आहेत. एक्स्प्रेस वेवरील फूडमॉलनजीक पहाटे एका ट्रकने दुसऱ्या ट्रकला आणि बसला ध़डक दिली. या धडकेत ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झालाय तर बसचालक, क्लीनर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.