मुंबई:  ऐन गर्दीच्या वेळीच ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. ठाणे - वाशी लोकलसेवा उशिराने सुरु आहे.   या मार्गावर एक रेल्वे बंद पडल्याने लोकल्सच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे पुढे कोणतीही लोकल जात नाही. परिणामी प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची मोठी गर्दी वाढत आहे.   कार्यालयाला जाण्याच्या वेळीच लोकल रखडल्याने प्रवाशांन मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.