मुंबई: पुढील 24 तासात मान्सून कोकणात दाखल होण्याची चिन्हं आहेत. कर्नाटक किनारा, दक्षिण कर्नाटक, रायलसीमा, आंध्र पदेशच्या काही भागात मान्सून वारे दाखल झाल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे.


 

शिवाय कोकणात मान्सून येण्यास अनुकूल स्थिती असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा, सावंतवाडी, आंबोलीमध्ये पावसाची संततधार सुरू आहे.

 

तळकोकणात पडणारा पाऊस ही मान्सूनचा चिन्हं असल्याचं समजतंय.

 

दरम्यान पुढच्या 24 तासात मान्सूनचे वारे महाराष्ट्रात दाखल होतील. मान्सूनच्या वाऱ्यांची हालचाल वेगानं असल्यानं आता राज्यातील बळीराजा सुखावला आहे.