येत्या आठ दिवसांत मुंबईतल्या रेल्वे स्थानकांचा कायापालट
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 02 Oct 2016 07:50 AM (IST)
मुंबई: मुंबईतल्या रेल्वे स्थानकांचा येत्या आठ दिवसांत कायापालट होणार आहे. 'मॅड आणि फर्स्ट मुंबई' या संस्थेच्या वतीनं 'हमारा स्टेशन, हमारी शान' ही योजना राबवण्यात येणार आहे. त्याअंतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील ३६ स्थानकं आकर्षक रंगात रंगवण्यात येणार आहेत. रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरणासाठी मंत्रालय, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थी, रेल्वप्रेमी असे सगळेच जण हातात ब्रश घेऊन या स्थानकांचा कालापालट करणार आहेत. येत्या आठ दिवसात हे काम पूर्ण होणार असल्याचे संस्थेच्यावतीने सांगण्यात येत आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्या या योजनेचा शुभारंभ होणार आहेत.