31 डिसेंबरला मुंबई वाहतूक पोलिसांची धडक कारवाई, मोठा दंडही वसूल
एबीपी माझा वेब टीम | 01 Jan 2017 03:30 PM (IST)
मुंबई : नववर्षाच्या स्वागतावेळी रात्री ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या 565 वाहनचालकांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. 31 डिसेंबरच्या निमित्ताने काल पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी ड्रंक अँड ड्राईव्हसोबतच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ड्रंक अँड ड्राईव्हप्रकरणी 565 जणांवर कारवाई करण्यात आली. तर रात्री हेल्मेटशिवाय गाडी चालवल्याप्रकारणी 207 दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात आली. तसंच बेदरकारपणे वाहन चालवल्याप्रकरणी 13 जणांवर कारवाई करण्यात आली. तसंच इतर कारणांसाठी 3 हजार 356 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. 31 डिसेंबरच्या रात्री 1 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत मुंबई वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली. यात एकूण 4 हजार 141 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसंच 3 लाख 87 हजार 800 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.