मुंबई: मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. अमृतांजन पूल ते खंडाळा बोगदा या 500 मीटर रस्त्यावर ऑइल सांडल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
त्यामुळे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगा 4 ते 5 किलोमीटरपर्यंत लागल्या आहेत.
ऑइल हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. मात्र मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
आज शनिवार असल्याने उद्याची सुट्टी पाहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त असते. विकेंडला एक्स्प्रेस वेवर नेहमीच ट्रॅफिक जाम होत असतं. त्यातच आता ऑईल सांडल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.