गणेशोत्सव काळात मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल
एबीपी माझा वेब टीम | 31 Aug 2016 07:34 AM (IST)
मुंबई: राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने जय्यत तयारी केली आहे. गणेशोत्सव काळात मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार गणेशोत्सव काळात 6, 9, 10, 11 आणि 15 सप्टेंबर या विसर्जनाच्या दिवशी मुंबईच्या वाहतुकीच्या मार्गात मोठे बदल करण्यात येणार आहेत. - मुंबईतील 49 रस्ते हे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येतील.. - 55 रस्त्यांवरील वाहतूक एक दिशा करण्यात येणार आहे. - 18 रस्त्यांवर अवजड वाहनांसाठी बंदी असणार आहे. - 99 रस्त्यांवर वाहने उभी करण्यास प्रतिबंध असेल.. - गणेशोत्सव काळात 3536 वाहतूक पोलीस कार्यरत असतील. - सशस्त्र पोलीस दलाचे 100 जवान,- अनिरुद्ध बापू डिझास्टर मॅनेजमेंटचे 6000 स्वयंसेवक -राष्ट्रीय सेवा योजनाचे 900 विद्यार्थी, नागरी संरक्षण दलाचे 1500 स्वयंसेवक - स्काऊट अँड गाईडचे 300 विद्यार्थी, गृहरक्षक दलाचे 250 जवान - 390 वाहतूक रक्षक - रस्ता सुरक्षा दलाचे 100 शिक्षक, राष्ट्रीय छात्र सेना 400 विद्यार्थी - जल सुरक्षा दलाचे 500 स्वयंसेवक, हॅम रेडिओचे स्वयंसेवक असा ताफा गणेशोत्सव काळात मुंबईच्या रस्त्यावर कार्यरत असेल.