गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे आपल्या भाषणांमधून सरकारवर निशाणा साधत आहेत. त्यामुळे आजच्या जाहीर सभेत राज ठाकरे नेमकं कुणावर शरसंधान साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात राज ठाकरे वसई, पालघर, वाडा, विक्रमगड, भिवंडी, शहापूर, मुरबाड, उल्हासनगर, बदलापूर येथील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.
लोकसभा निवडणुकीला अवघा एक वर्ष शिल्लक असल्याने राज ठाकरे यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यासाठीच हा महाराष्ट्र दौरा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 2014 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव झाला होता. मोदी लाटेचा बराचसा फटका मनसेला बसला होता. मात्र, आता सरकारविरोधी वातावरण तयार करण्यासाठी मनसेनेही कंबर कसली आहे.
ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे शिवसेनेला कडवं आव्हान देण्यासाठी मनसेनं आतापासूनच व्यूहरचना सुरु केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मनसे कशी कामगिरी करते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.
संबंधित बातम्या :
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पहिलंवहिलं ट्वीट