नवी मुंबईत 50 लाखांची लूट करणाऱ्या तीन आरोपींना अटक
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 17 Jun 2017 12:09 AM (IST)
नवी मुंबई: नवी मुंबईतल्या नेरुळमध्ये ज्वेलर्सवर दरोडा टाकून 50 लाखांची लूट करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. एकाला झारखंडमधून तर दोघांना मुंबई आणि उरणमधून अटक करण्यात आली आहे. तर पाच फरार आरोपींचा शोध सुरु आहे. अटक आरोपींकडून 15.5 तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि 1 किलो 300 ग्रॅमचे चांदीचे दागिने असा 4 लाख 81 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सीवूड दारावेतील मयुरा ज्वेलर्सच्या भिंतीला भगदाड पाडून गॅस कटरनं तिजोरी फोडून ही चोरी करण्यात आली होती. हे आरोपी आंब्याचे व्यापारी असल्याचं सांगून ज्वेलर्सच्या शेजारचं दुकान भाड्यानं घ्यायचे आणि भिंतीला भगदाड पाडून चोरी करत असल्याचं समोर आलं आहे.