भिवंडी : शाळेला सुट्टी लागल्याने मावशीकडे पाहुणे आलेल्या मुलांना विरंगुळा म्हणून दुचाकीवरुन फेरफटका मारण्यास निघालेल्या मामाच्या दुचाकीला कारची जोरदार धडक लागून अपघात झाला. या अपघातात तीन भावंडांसह मामा गंभीर जखमी झाल्याची घटना भिवंडी तालुक्यातील कवाड नाका येथे आज घडली आहे.
मामा आकाश सुरेश अबनवे (26) , कुमकुम राजीव शहा (13), रौनिक शहा (12) अंकित शहा (10) अशी अपघातात जखमी झालेल्या मामा-भाच्यांची नावं आहेत. या तिन्ही भावंडाचे पाय फ्रॅक्चर झाल्याने त्यांच्यावर प्रथम भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करुन पुढील उपचारासाठी त्यांना एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या तिन्ही भावंडाना शाळेला उन्हाळी सुट्टी लागल्याने ते शनिवारी शेलार येथे राहणाऱ्या मावशीकडे पाहुणे आले होते. या मुलांना हौसेखातर मामा आकाश याने आज दुपारच्या सुमाराला फेरफटका मारण्यासाठी आपल्या पॅशन प्रो दुचाकीवर बसवून त्याने कवाड नाका येथे नेवून पुन्हा माघारी परतले. त्यावेळी वळण घेत असताना भिवंडीच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या कारची जोरदार धडक बसली. सुदैवाने मामासह तिन्ही भावंडे रस्त्याच्या कडेला फेकल्याने बचावली आहेत. मात्र या अपघात तिन्ही भावंडाचे पाय फ्रॅक्चर झाले. या अपघाताची नोंद भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सुट्टीसाठी मावशीकडे आले, दुचाकीवरुन पडून तीन भावांचे पाय निकामी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Apr 2018 08:20 PM (IST)
हौसेखातर मामा आकाश याने दुपारच्या सुमाराला फेरफटका मारण्यासाठी आपल्या पॅशन प्रो दुचाकीवर बसवून भाच्यांना कवाड नाका येथे नेवून पुन्हा माघारी परतले. त्यावेळी वळण घेत असताना भिवंडीच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या कारची जोरदार धडक बसली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -