मुंबई : वांद्रे कुर्ला संकुलातील (बीकेसी) एमएमआरडीए मैदानाचे गेट आता काही वर्षे राजकीय पक्षांच्या सभा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना बंद होणार आहेत. कारण पुढील सहा वर्षांसाठी एमएमआरडीए मैदान बुलेट ट्रेन टर्मिनल आणि मेट्रोसाठी वापरलं जाणार आहे.
एमएमआरडीएने एक एप्रिलनंतरचे एकूण 36 कार्यक्रम रद्द केले आहेत. याचा मोठा फटका आयोजकांना बसल्याचं सांगितलं जातं आहे.
बीकेसीतील एमएमआरडीए ग्राऊंडची वैशिष्ट्यं :
- मुंबईतील मध्यवर्ती मोकळं मैदान असलेलं ठिकाण
- सेंट्रल, वेस्टर्न आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वेमार्गांची कनेक्टिव्हिटी
- फाईव्ह स्टार हॉटेल्स, बँक आणि कॉर्पोरेट ऑफिसेसचं हब
- 50 एकरची मोकळी जागा
- पार्किंगसाठी मोकळी जागा
- सुमारे दोन लाखांपर्यंतची फ्लोटिंग गर्दी होल्ड करण्याची क्षमता
बीकेसीतील एमएमआरडीए मैदान लाईव्ह कॉन्सर्ट्स, अवॉर्ड शोज, एक्झिबिशन सेंटर्स, राजकीय सभांचं हॉट डेस्टिनेशन म्हणून ओळखलं जात होतं.