खोलीत कोंडून दोन अल्पवयीन मुलींची छेडछाड, तिघांना अटक
एबीपी माझा वेब टीम | 31 Mar 2017 10:37 AM (IST)
मुंबई: दोन अल्पवयीन मुलींची छेडछाडप्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन मुलांना अटक केली आहे. मुंबईतील मालाड परिसरात ही घटना घडली. पोलिसांच्या मते, आरोपी मुलं आणि पीडित मुली हे एकाच परिसरातील राहणारे असून ते एकमेकांना ओळखतात. मिळालेल्या माहितीनुसार, तीन आरोपींनी दोन पीडित मुलींना गुरुवारी रात्री एका खोलीत बंद करुन त्यांच्याशी गैरवर्तणूक केली. दरम्यान, उशीरा रात्री या दोन्ही मुलींनी आरोपींना गुंगारा देत तिथून पळ काढला. त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबीयांनी घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर मुलींच्या कुटुंबीयांनी कुरार पोलीस स्थानकात या प्रकरणी तक्रार नोंदवली. पोलिसांनी तो आरोपींविरोधात कलम 354 आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करुन तीनही आरोपींना अटक केली आहे. यातील एक आरोपी 19 वर्षांचा तर दुसरा 22 वर्षाचा आहे. सध्या पोलीस या तिघांचीही कसून चौकशी करत आहेत.