Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या दिवाळीची ( DIWALI 2022 ) धामधून असल्यामुळे उद्या म्हणजे 23 ऑक्टोबर रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक (Mumbai Mega Block ) नसणार आहे.  दिवाळीनिमित्त मध्य (Central Railway)  आणि पश्चिम रेल्वेवर (Western Railway) उद्या मेगा ब्लॉक नसणार आहे. रेल्वेच्या या महत्वाच्या निर्णयामुळे 23 ऑक्टोबर रोजी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार आहे. 


मेगा ब्लॉक नसला तरी रविवारचे वेळापत्रक लागू
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगा ब्लॉक नसला तरी उद्या रविवारचे वेळापत्रक लागू राहणार आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा कमी लोकल फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. दिवाळीचा सण झाला आहे. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी मुंबईकरांची लगबग सुरू झाली आहे. त्यात उद्या रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे मुंबईकर खरेदीसाठी घराबाहेर पडणार. यावेळी मुंबईकरांना प्रवास करताना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागून नये यासाठी रेल्वेकडून मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही.  


प्लॅटफॉर्म तिकिटात वाढ (Platform ticket increased )
रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकिटामध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.  कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दोन वर्षांनी देशभरात मोठ्या उत्सवात दिवाळी सण साजरा केला जात आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा हाऊसफुल झाल्या आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील गर्दीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबईत रेल्वेनं येणाऱ्या अथवा मुंबईतून रेल्वेनं जाणाऱ्या प्रवाशांचीही संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच मुंबईतील महत्वाच्या रेल्वे स्थानकातील वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकिटाच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ ठराविक स्थानकात आणि तात्पुरत्या स्वरुपाची असेल. 22 ऑक्टोबर 2022 ते 31 ऑक्टोबर या कालवाधीत महत्वाच्या रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 50 रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्लॅटफॉर्मवर जाताना तिकीट काढूनच जावे लागणार आहे, अन्यथा दंड भरावा लागणार आहे. 


मोजक्याच स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीटात वाढ (Platform ticket increased )
रेल्वेकडून मुंबईतील मोजक्याच स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीटात वाढ करण्यात आली आहे. यामध्ये सीएसएमटी (CSMT), दादर (Dadar), ठाणे (Thane), कल्याण (Kalyan), लोकमान्य टीळक टर्मिनस (LTT) आणि पनवेल रेल्वे स्थानकाचा समावेश आहे.


महत्वाच्या बातम्या 


CSMT, दादर, ठाणे, कल्याणसह महत्वाच्या रेल्वे स्थानकावर आता प्लॅटफॅार्म तिकिट 50 रुपये