भिंवडी : भिंवडी तालुक्यात मुंबई-नाशिक रोडवर असलेल्या शांग्रीला रिसॉर्टमध्ये लॉकर फोडून चोरी करण्यात आली आहे. लॉकर फोडून रोख रकमेसह मोबाईल आणि घडाळ्यांची चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
गोवंडीतील अन्वर हे कुटुंबीयांसह शांग्रीला वॉटर पार्कमध्ये सहलीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी चेंजिंग रुममध्ये भाड्याने लॉकर घेऊन त्यात किमती वस्तू ठेवल्या होत्या.
दरम्यान, चोरट्यांनी लॉकर तोडून महागडे मोबाईल, घड्याळं, रोख रक्कम असा एकूण ३७ हजार किंमतीचा ऐवज चोरुन नेला.
मात्र, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ आरोपींच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी असिफ सैय्यद, रिजवान खान आणि रूबान रहिम बाटा या तिघा चोरट्यांना मुंब्रा परिसरातून अटक करण्यात आली आहे. न्यायालयानं आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
भिवंडीतील शांग्रीला रिसॉर्टच्या लॉकरमधून महागड्या वस्तूंची चोरी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Sep 2017 09:22 AM (IST)
भिवंडीतील शांग्रीला रिसॉर्टमध्ये चोरट्यांनी लॉकर तोडून महागडे मोबाईल, घड्याळं, रोख रक्कम असा एकूण ३७ हजार किंमतीचा ऐवज चोरुन नेला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -