ओला-उबर चालक संपावर, मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता
एबीपी माझा वेब टीम | 19 Sep 2017 08:03 AM (IST)
अधिक उत्पन्न आणि सुरक्षित भवितव्यासाठी चालकांनी हा संप पुकारल्याची माहिती आहे. संप तीव्र करण्याच्या उद्देशाने अनेक चालक राष्ट्रीय मिल मजदूर संघात सहभागी होण्याची चिन्हं आहेत.
मुंबई : ओला आणि उबर चालकांच्या संघटनेने मुंबईत संपाचं हत्यार उपसलं आहे. सोमवार मध्यरात्रीपासून ओला-उबर चालक संपावर गेल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. अधिक उत्पन्न आणि सुरक्षित भवितव्यासाठी चालकांनी हा संप पुकारल्याची माहिती आहे. संप तीव्र करण्याच्या उद्देशाने अनेक चालक राष्ट्रीय मिल मजदूर संघात सहभागी होण्याची चिन्हं आहेत. मुंबईत सध्या ओला-उबरच्या 30 हजार कॅब सुरु आहेत. त्यामुळे मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणावर हाल होण्याची भीती आहे. दरम्यान, चालकांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करु असं आश्वासन चालकांना देण्यात आलं आहे. अधिक उत्पन्न आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं.