वसई: वसईमध्ये पहिल्याच पावसात तेवीस लाख रूपये खर्च करून बांधलेला रस्ता खचून गेला आहे. वसई तालुक्यातील मेढा ग्रामपंचातीच्या हद्दीत साखरपाडा-घोडविंदेपाडा-भोईरपाडा असा हा पूल महिन्याभरापूर्वीच बांधण्यात आला होता.
मात्र, कालपासून वसईत पावसानं लावलेल्या दमदार हजेरीत संपूर्ण रस्ता वाहून गेला तसंच पुलालाही तडे गेले. जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर संपूर्ण पूलही पावसात वाहून जाईल. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अवघ्या महिन्याभरातच पुलाची बिकट अवस्था झाल्यानं मेढा ग्रामस्थांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, याप्रकरणी खासदार बळीराम जाधव यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.