ठाणे : ठाणे पोलिस मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या महिला पोलिसाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. कळवामधील राहत्या घरी बुधवारी रात्री गळफास घेऊन तिने आयुष्य संपवलं.
सारिका पवार असं आत्महत्या केलेल्या 21 वर्षीय महिला पोलिस शिपाईचं नाव आहे. परंतु आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
दरम्यान, याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे पोलिसांकडून आणखी माहिती मिळालेली नाही. तिच्याकडून सुसाईड नोट मिळालेली नाही. पोलिसांनी सारिका पवारचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
दुसरीकडे, ज्या मुलाशी सारिकाचं लग्न ठरलं होतं, तो आत्महत्येपूर्वी तिच्या घरी होता. मात्र फोन करण्याच्या निमित्ताने तो घराबाहेर गेला. त्यादरम्यानच सारिकाने आत्महत्या केली, अशी माहितीही समोर येत आहे.
ठाणे पोलिस मुख्यालयातील 21 वर्षीय महिला पोलिसाची आत्महत्या
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
07 Sep 2017 08:06 AM (IST)
सारिका पवार असं आत्महत्या केलेल्या 21 वर्षीय महिला पोलिस शिपाईचं नाव आहे. परंतु आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -