ठाण्यातील चेकमेटवरील दरोड्या प्रकरणी सात संशयित ताब्यात
एबीपी माझा वेब टीम | 30 Jun 2016 09:44 AM (IST)
ठाणे : मंगळवारी ठाण्यात पडलेल्या दरोड्याप्रकरणी सात जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यापैकी काही जणांना नाशिकमधून चौकशीसाठी ताब्यात घेतलं गेलंय. बँकांमध्ये पैसे पुरवणाऱ्या चेकमेट प्रायव्हेट सर्विसेस या कंपनीवर मंगळवारी पहाटे सशस्त्र दरोडा पडला होता. तीन हात नाका परिसरात पहाटे 4 वाजता ही घटना घडली. या दरोड्यात 5 ते 6 कोटी रुपये लुटले गेल्याची माहिती आहे.