महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली शीळ फाटा येथून पोलिस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात करण्यात आली. या कारवाईमध्ये शुभम लॉज, कोकण किंग, वर्षा लॉज, सागर लॉज, सचिन लॉज, साई विहार लॉज, रोहित लॉज, प्रेम लॉज, हनुमान लॉज तोडण्यात आले.
ब्रिस्टो ग्रील, लीला बार, रॉक्स स्टार या लेडीज बारवर हातोडा चालवण्यात आला आहे. तर भाईजान, मेजबान, शेजवान, मोघल धाबा, फूड टॉक, नवाजा, गुगील्स रेस्टॉरंट, नाईट लाईफ, मोती महल, ग्रीन लॉन, दोस्ती, अंबानीज, आरक्षित भुखंडावरील ग्रीन पार्क, मून लाईट, आर. बी. एन. नाईट, लाईट नाईट, व्हॉटसअप, सुफी धाबा, बायपास धाबा, टकाटक, ब्लू लॉन या हुक्का पार्लर्सचा समावेश आहे.
ठाण्यातील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांविरोधात पालिकेची धडक कारवाई सुरु असताना सत्यम लॉजच्या खाली तीन मजल्यांचं अवैध बांधकाम आढळून आलं होतं. पालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांच्या आदेशानंतर ते जमीनदोस्त कऱण्यात आलं होतं.