ठाणे : ठाणे महानगरपालिका पंधरा खाजगी covid-19 च्या रुग्णालयांना नोटीस बजावणार आहे. या सर्व रुग्णालयांची मिळून 27 लाख रुपयांची 196 रुग्णांची देयके अवाजवी असल्याचे मुख्य लेखापाल यांच्या तपासणीमध्ये आढळून आले आहे. या देयकांसंदर्भात रुग्णालयांकडून खुलासा मागविण्यात आला आहे. त्या खुलाशाची शहानिशा करून जर हि देयके वाढीव असल्याचे लक्षात आले तर अधिकचे आकारलेले पैसे त्या रुग्णांना परत करण्याचे आदेश महापालिका देणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा देयके आकारण्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी मुख्य लेखापाल यांची निवड करून त्यांच्याकडून या रुग्णालयांनी आकारलेल्या देयकांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.
महापालिकेने घोषित केलेल्या खासगी कोवीड रुग्णालयांनी कोरोना बाधित रूग्णांकडून जादा बिल आकारल्याचे सिद्ध झाल्यास, वाढीव रक्कम तात्काळ रूग्णांच्या खात्यात परत करण्यातचे आदेश महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिले होते. त्यासाठी मुख्य लेखा परीक्षक किरण तायडे यांच्या अंतर्गत विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने शहरातील 15 कोवीड रूग्णालयांची तपासणी करून जवळपास 27 लाख रूपयांची 196 आक्षेपित देयकांची नोंद केली आहे. या सर्व रूग्णालयांना महापालिकेने नोटीस देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. महापालिकेने खासगी कोवीड रूग्णालयाने त्यांच्याकडे दाखल झालेल्या कोरोना बाधित रूग्णांकडून किती देयक आकारावे याचे दर यापूर्वीच निश्चित केले होते. तरीही अनेक रुग्णालये अव्वाच्या सव्वा देयके करत असल्याच्या अनेक रुग्णांच्या तक्रारी होत्या.
हे लक्षात आल्यावर मुख्य लेखा परीक्षक यांच्या अधिपत्याखाली पथकाने केलेल्या तपासणीत पंधरा वेगवेगळ्या कोव्हिडच्या हॉस्पिटलमधील 1752 देयकांची तपासणी करण्यात येत आहे. त्यापैकी 486 देयकांची या पथकाने तपासणी करून एकूण 196 आक्षेपित देयकांची नोंद करण्यात आली आहे. या एकूण 196 आक्षेपित देयकांची रक्कम ही 27 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या रुग्णालयांना आता नोटीस बजावण्यात येणार आहे. या सर्व आक्षेपित देयकांबाबत संबंधित रूग्णालयांकडून तात्काळ खुलास मागविण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिले आहेत. संबंधित रूग्णालयांकडून खुलासा प्राप्त झाल्यानंतर त्याची शहानिशा करून ज्या रूग्णालयांने एखाद्या रूग्णांकडून वाढीव रक्कम वसूल केल्याचे सिद्ध झाल्यस ती जादा आकारण्यात आलेलली रक्कम संबधित रूग्णाच्या खात्यावर परत करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
Thane Lockdown | ठाण्यात लॉकडाऊन संपणार की वाढणार? महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांच्याशी चर्चा