ठाणे स्टेशनबाहेर फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची मनसेकडून तोडफोड
एबीपी माझा वेब टीम | 21 Oct 2017 10:04 AM (IST)
एल्फिन्स्टन स्थानकावरील चेंगराचेंगरीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रेल्वे प्रशासनाला दिलेली डेडलाईन आज संपली
ठाणे : रेल्वे प्रशासनाला फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदर्भात दिलेली 15 दिवसांची डेडलाईन संपल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. ठाणे स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांवर मनसे स्टाईल आंदोलन करत कारवाई करण्यात येत आहे. मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड केली आहे. एल्फिन्स्टन स्थानकावरील चेंगराचेंगरीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रेल्वे प्रशासनाला दिलेली डेडलाईन आज संपली.