फेरीवाल्यांवरील कारवाईबाबत राज ठाकरेंची डेडलाईन संपली
एबीपी माझा वेब टीम | 21 Oct 2017 08:13 AM (IST)
15 दिवसात रेल्वे स्थानकं फेरीवालेमुक्त न झाल्यास 16 व्या दिवशी आपल्या स्टाइलनं पादचारी पूल आणि रस्ता फेरीवालामुक्त करु, असं राज ठाकरेंनी रेल्वे प्रशासनाला ठणकावलं होतं.
मुंबई : एल्फिन्स्टन स्थानकावरील चेंगराचेंगरीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रेल्वे प्रशासनाला दिलेली डेडलाईन आज संपली आहे. त्यामुळे राज ठाकरे यापुढे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. मुंबईतील एलफिन्स्टन रोड स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मनसेने ‘संताप मोर्चा’चं आयोजन केलं होतं. मुंबईतील मेट्रो सिनेमा ते चर्चगेट असा भव्य मोर्चा काढून राज ठाकरे यांनी चर्चगेटमधल्या रेल्वे कार्यालया आपलं निवेदन रेल्वे प्रशासनाला दिलं.