ठाणे महापालिका निवडणुकांसाठीचं आरक्षण आधीच फुटलं, मनसेचा आरोप
एबीपी माझा वेब टीम | 06 Oct 2016 09:34 PM (IST)
ठाणे: ठाणे महापालिकेच्या निवडणुकांसाठी उद्या जाहीर होणारं आरक्षण आधीच फुटल्याचा आरोप मनसेनं केला आहे. नव्या वॉर्ड रचना आणि राखीव प्रभागांची माहिती असलेले कागद पालिकेच्या वर्तुळात फिरत आहेत. तर आरक्षणाची सविस्तर माहिती असणाऱ्या कागदांना महापौरांच्या कार्यालयातून पाय फुटल्याचा आरोप मनसेनं केला आहे. हे आरक्षणाचे कागद दाखवून पक्ष परस्परांच्या पक्षातील लोकांना आपल्याकडे ओढण्याचा आणि फोडण्याचा जोरदार प्रयत्न करत असल्याचा आरोपही मनसेनं केला आहे. मनसेने केलेल्या या आरोपांमुळे नेमकं काय होणार याकडे ठाणेकरांचं लक्ष लागून राहिलं आहे तर दुसरीकडे निवडणुकीआधीच आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.