ठाण्यात बाळचोर महिलेकडे सापडलेली 6 मुलं तिचीच अपत्यं
एबीपी माझा वेब टीम | 24 Jan 2018 09:59 AM (IST)
बाळ चोरल्यानंतर गुडिया, सोनू, त्यांची मुलगी आणि विजय यांनी ठाणे स्टेशनवरुन पहाटे 4.39 वाजता अंबरनाथ-सीएसएमटी लोकल पकडली.
ठाणे : गेल्या आठवड्यात ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयातून बाळचोरी करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत बेड्या ठोकल्या. त्यावेळी, आरोपी महिलेच्या घरी सापडलेली सहा मुलं तिने पळवून आणल्याचा पोलिसांचा कयास होता, मात्र डीएनए टेस्टमध्ये ती मुलं आरोपी महिलेचीच अपत्य असल्याचं निष्पन्न झालं आहे. भिवंडी येथील मोहिनी मोहन भुवर याचं पाच तासांचं बाळ ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयातल्या प्रसुती कक्षातून चोरण्यात आलं होतं. एक महिला बाळाला पळवून नेताना सीसीटीव्हीत कैदही झाली होती.