नवी मुंबई : वाढत्या प्रवासी गर्दीवर तोडगा म्हणून हार्बर मार्गावर १० तर ट्रान्स हार्बर मार्गावर तब्बल १६ नव्या सेवा सुरू करण्यात येणार आहेत. ३१ जानेवारी पासून या नवीन सेवा सुरु होणार आहेत.
हार्बर मार्गावरील दहा सेवा वाढल्यानं दर दिवासांच्या फेऱ्यांची संख्या 604 वरुन 614 होणार आहे तर ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवांची संख्या 246 वरुन 262 वर पोहोचणार आहे. या सेवा सुरु झाल्यावर हार्बर मार्गावरील वेळापत्रकातही बदल होणार असून अनेक गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या फेऱ्या वाढवल्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवसेंदिवस हार्बर मार्गावरील लोकल बऱ्याच प्रमाणात ताण वाढत आहे. त्यामुळे प्रवााशांना बराच मनस्तापही सहन करावा लागतो. त्यामुळे या मार्गावरील लोकल फेऱ्या वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे.
३१ जानेवारीपासून हार्बर मार्गावरील लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jan 2018 12:05 AM (IST)
वाढत्या प्रवासी गर्दीवर तोडगा म्हणून हार्बर मार्गावर १० तर ट्रान्स हार्बर मार्गावर तब्बल १६ नव्या सेवा सुरू करण्यात येणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -