ठाण्यात आमदार रविंद्र चव्हाणांना धक्काबुक्कीचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम | 03 Feb 2017 10:46 AM (IST)
ठाणे : ठाण्याचे भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांना भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्कीचा प्रयत्न केला. ठाण्यातील खोपट येथील भाजप कार्यलयात इच्छुक उमेदवारांनी तिकीट वाटपावरुन गोंधळ केला. पैसे घेऊन उमेदवारी वाटल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. रात्री 12 च्या सुमारास अर्वाच्य भाषा वापरुन कार्यकर्त्यानी आपला संताप व्यक्त केला. मुलाखती झाल्या नाहीत. कामं करुनही आम्हाला तिकीट न दिलं नाही. पैसे देऊन तिकीटं वाटली, असा आरोप इच्छुक उमेदवारांनी यावेळी केला.