मुंबई : बहुप्रतिक्षित ठाकरे सिनेमाचा म्युझिक लॉन्च सोहळा दिमाखात मुबंईत पार पडला. ठाकरे सिनेमातील गाणी यावेळी प्रदर्शित करण्यात आली. सोहळ्याला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, अमृता राव, निर्माते आणि खासदार संजय राऊत आणि खुद्द उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते.


‘आया रे सबका बापरे, कहते है उसको ठाकरे...’ हे हिंदी गाणं यावेळी प्रदर्शित करण्यात आलं. अवघ्या काही मिनिटातच या गाण्याला यूट्युबवर लोकांची पसंती मिळत आहे. हे गाणं नकाश अजीजने गायलं आहे. गाण्याच्या मेकिंगचा अनुभव सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला थोडं भान ठेवावं लागतं, अन्यथा मला ऐकवलेल्या गाण्यावर ठेका धरावसा वाटला होता.


ठाकरे हिंदी चित्रपट सेन्सॉरमधून सुटला आहे. थोडी आम्हीही धार लावली, पण सुटला. उद्या मराठी चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे जाणार आहे. हा चित्रपट पक्षाचा प्रचार करण्यासाठी निर्माण केला नसल्याची प्रतिक्रिया खासदार आणि निर्माते संजय राऊत यांनी दिली.


शिवसेना खासदार संजय राऊत प्रस्तुत, राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी, वायकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि कार्निव्हल मोशन पिक्सर्च निर्मित 'ठाकरे' हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. नवाझुद्दीन सिद्दीकी या सिनेमात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारत असून मराठी भाषेसाठी अभिनेते सचिन खेडेकर यांनी आवाज दिला आहे. तर अभिनेत्री अमृता राव माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.



संबंधित बातम्या


सत्तर रुपयांचा 'शिववडा' खात थिएटरमध्ये 'ठाकरे' पाहा!


'ठाकरे' साठी दोन हिंदी चित्रपटांच्या तारखा पुढे ढकलल्या!


'ठाकरे' सिनेमातील संवादावर अभिनेता सिद्धार्थचा आक्षेप


'ठाकरे' व्यतिरिक्त कोणताही सिनेमा रिलीज होऊ देणार नाही : बाळा लोकरे


बायोपिकच्या सिक्वलचाही विचार, 'ठाकरे' च्या ट्रेलर लॉन्चिंगला दिग्गजांची उपस्थिती