मुंबई : भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तयार केले जाणाऱ्या मुंबईतल्या अनेक ठिकाणांवर गेल्या काही दिवसांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. आता वसईमध्येदेखील अशीच कारवाई करण्यात आली आहे. वसईत 350 किलो निकृष्ट दर्जाचे पनीर जप्त करण्यात आले आहे.


वसईच्या कामण परिसरातील शुक्ला डेअरीत घाणीच्या साम्राज्यात पनीरमध्ये भेसळ करून मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे पनीर तयार केले जाते. पालघर पोलीस अधिक्षक गौरव सिंह यांचे पथक आणि अन्न व औषध पथकाचे अधिकार यांनी एकत्रितपणे गुरुवारी रात्री 8 च्या सुमारास कारवाई करत 350 किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले आहे.

सिंथेटिक अॅसिड तसेच विविध प्रकारच्या पावडर्स मिसळून हे पनीर बनवले जाते. आरोग्याला अपायकारक असणारे हे पनीर राजरौसपणे शहरातील हॉटेल्समध्ये, लहान-मोठ्या फुड कॉर्नर्समध्ये, रस्त्यावर खादपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांकडे वितरीत केले जाते.