गर्दीच्या वेळी रेल्वे स्थानकावर महिलांची छेड, आरोपी अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 28 Jul 2016 02:28 AM (IST)
पनवेल: पनवेल रेल्वे स्थानकावर गर्दीचा फायदा घेत महिलांची छेडछाड करणाऱ्याला पोलीसांनी अटक केली आहे. अमोल उरणकर असं त्याचं नाव आहे. तो पनवेल रेल्वे स्थानकावर गर्दीचा फायदा घेत महिलांची छेडछाड करायचा. यासंदर्भात एका महिलेने पनवेल पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी पनवेल स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपीने इतर महिलांची छेडछाड केल्याचंही निदर्शनास आलं. त्यानंतर पोलिसांनी अमोल उरणकरला सापळा रचून अटक केली. आरोपी अमोल उरणकर हा एका जाहिरात कंपनीमध्ये काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, आरोपी अमोलची सध्या पोलीस कसून चौकशी करत आहेत.