मुंबई : जीएसटी लागू झाल्यानंतर देशभरात उत्सव साजरा केला जातोय. जीएसटीमुळे
जकात नाके बंद झाले आहेत. त्यामुळे शहरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे जीएसटीची मिठाई भरवणाऱ्यांनो मुंबईच्या सुरक्षेकडे लक्ष द्या, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
देशात जीएसटी लागू झाल्यानंतर आजपासून जकात नाक्यांवरची वसुली बंद झाली आहे. वाशी, ऐरोली, पनवेल, मुलुंड आणि दहिसर या मुंबईच्या एंट्री पॉईंटवरील सर्वच जकात नाके बंद झाले आहेत.
या जकात नाक्यांच्या माध्यमातून महापालिकांच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होत होता. पण, आता जीएसटी लागू झाल्याने महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्वपूर्ण स्त्रोत बंद झाला आहे. दरम्यान, मध्यरात्रीपासून देशात एक देश एक कर लागू झाला. संसदेतील कार्यक्रमात मध्यरात्री 12 वाजता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान मोदीच्या हस्ते जीएसटी लाँच करण्यात आला. देश आर्थिक सुधारणांच्या नव्या मार्गावर वाटचाल करेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दिली.
संबंधित बातम्या:जीएसटीचं लोकार्पण, देशात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कर प्रणालीत बदल जीएसटी म्हणजे ‘गुड अँड सिंपल टॅक्स’ : पंतप्रधान मोदी जीएसटीमुळे देशातील महागाई कमी होणार : अरुण जेटली जीएसटी लागू झाल्यानंतर या वस्तू महागणार!