जीएसटी लागू झाल्यानंतर मध्यरात्री बिग बाझारमध्ये बंपर सूट
एबीपी माझा वेब टीम | 01 Jul 2017 12:55 PM (IST)
मुंबई: एकीकडे जीएसटी लॉन्च होत असताना तिकडे जीएसटीच्या स्वागतासाठी बिग बाझारनं मोठी सवलत जाहीर केली होती. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूरमध्ये बिग बाझारचे सगळे स्टोअर्स रात्री 12 ते 2 वाजेपर्यंत सुरू होते. बिग बाझारमधील सर्व वस्तूंवर मोठी सूट देण्यात आली होती. त्यामुळे साहजिकच रात्री 2 वाजेपर्यंत ग्राहकांनी बिग बाझारमध्ये गर्दी केली होती. दरम्यान, जीएसटी लागू झाल्यानंतर करप्रणालीत होणारे अमूलाग्र बदल आणि इतर वस्तूंच्या वाढणाऱ्या किंमती लक्षात घेता काल देशभर दिवाळीसारखा माहौल आहे. कारण इलेक्ट्रॉनिक वस्तू, ब्रँडेड कपडे, चप्पल बूट यासह विविध वस्तूंचे बंपर सेल सध्या देशभर सुरु होते. जीएसटीच्याआधी दुकानदारांनी बंपर ऑफर दिल्या. त्यामुळं ग्राहकही तुटून पडले. काल तुफान गर्दीनं भरलेल्या दुकानांमध्ये आज मात्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे.