मुंबईला दुधाचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी मुंबई पोलीस रात्री स्वतः रस्त्यावर उतरले होते. मुंबईच्या एन्ट्री पॉईंट्सपासून प्रत्येक दुकानापर्यंत दुधाच्या गाड्यांना संरक्षण दिले जात होते. अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक दुधाच्या गाडीसोबत एक पोलीस गाडी फिरत होती. मुंबईत येणारे दूध मुंबई बाहेरुन येत असते. त्याच पार्श्वभूमीवर हे संरक्षण दिले गेले.
पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद परिसरात मोठ्या प्रमाणावर दूधाचा पुरवठा रोखण्यात आला आहे. पुण्यात तर रस्त्यावर दूध फेकून देण्यात आलंय. गोकुळसह काही दूध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यभर पुकारलेल्या दूध आंदोलनाला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. राजू शेट्टी यांच्या मागणीला पाठिंबा देत शिवसेना आणि राष्ट्रवादीने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे.
नेमक्या मागण्या काय?
- दूध उत्पादकांना सावरण्यासाठी प्रतिलिटर पाच रुपये सरकारला देणं शक्य आहे. गोवा, कर्नाटक सरकार अशी मदत करतं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही तशी मदत करावी, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे.
- पाच रुपयांच्या अनुदानाची ही मागणी गाईच्या दुधासाठी असून दररोज अतिरिक्त ठरणारं चाळीस लाख लिटर गाईच दुध सराकरने सत्तावीस रुपये प्रति लिटर दराने खरेदी करण्याची मागणीही स्वाभिमानीकडून करण्यात आली आहे.
- या आंदोलनातून मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखण्याचा स्वाभिमानीचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे रविवारी मध्यरात्रीपासून मुंबईची दूधकोंडी होण्याची शक्यता आहे.
संबधित बातम्या
राज्यभरात दूधकोंडी : कुठे काय घडलं?
राजू शेट्टींच्या दूध आंदोलनाची सदाभाऊंनी खिल्ली उडवली!
दूध पुरवठा सुरळीत राहिल, तुटवडा निर्माण होऊ देणार नाही : मुख्यमंत्री
मुंबईच्या दुधाची उद्याची पॅकिंग पूर्ण करुन तीन दिवसांचा साठा, 'वारणा'ची तयारी