मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे दिल्लीत जाणार की महाराष्ट्रात राहणार, याचा सस्पेंस अद्यापही कायम आहे. कारण याबाबत आपण दोन दिवसानंतर निर्णय घेणार असल्याची माहिती राणेंनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी नारायण राणे थेट विधिमंडळात गेले होते. यावेळी दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील मात्र कळू शकला नाही.
आपण महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलो होतो, असं राणे म्हणाले. त्यामुळे राणे नेमका काय निर्णय घेतात यासाठी दोन दिवस वाट बघावी लागणार आहे.
“मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. माझं मत मी व्यक्त केलं. यावर दोन दिवसांनी सर्व चित्र स्पष्ट होईल. माझ्या विषयावर मुख्यमंत्री अमित शहा यांचीशी चर्चा होईल. दिल्लीत जाऊ नये, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे दोन दिवसांत कळेल.”, अशी प्रतिक्रिया नारायण राणेंनी दिली.
महाराष्ट्र की दिल्ली? राणेंचा सस्पेंस कायम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Mar 2018 08:05 PM (IST)
आपण महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलो होतो, असं राणे म्हणाले. त्यामुळे राणे नेमका काय निर्णय घेतात यासाठी दोन दिवस वाट बघावी लागणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -