मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धभवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीचा राज्यातील उच्च शिक्षणावर याचा नेमका काय परिणाम झालाय आणि विद्यार्थ्यांच्या मनात नेमकं काय आहे? याबाबत प्राध्यापक बी एन जगताप आणि उच्च शिक्षण अभ्यासक आनंद मापुसकर यांनी एक सर्व्हे केला आहे. यामध्ये ऑनलाईन शिक्षण, अंतिम वर्ष परीक्षा, पुढील शैक्षणिक वर्ष, रोजगार संधी, आर्थिक परिस्थिती याबाबत प्रश्न विचारून जवळपास राज्यातील 38 हजार विद्यार्थ्यांची मतं जाणून घेतली आहेत. या सर्व्हेतून नेमकं काय समोर आलंय जाणून घेऊया.
ऑनलाईन शिक्षणाची सद्यस्थिती
- ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 91 टक्के आहे
- 6 टक्के विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी कोणतेही साधन नाही
नोकरीविषयी
- कोरोनाची स्थिती पाहता 51 टक्के विद्यार्थ्यांना पार्टटाईम नोकरी करण्याची इच्छा आहे.
- 19 टक्के विद्यार्थी कमवा आणि शिका योजनेचा विचार करत आहे.
- 9 टक्के विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबाला शेतीत किंवा व्यसवसायत पार्टटाईम मदत करण्याची इच्छा आहे.
- तर 9 टक्के विद्यार्थी अभ्यास सोडून फुलटाईम नोकरीचा विचार करत आहेत.
ऑनलाईन शिक्षणाबाबत
- ऑनलाईन शिक्षण 33 टक्के विद्यार्थ्यांना उपयुक्त वाटत आहे.
- 26 टक्के विद्यार्थ्यांना फेस टू फेस शिक्षणाला पसंती दिली आहे.
- तर 4 टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणाला नापसंती दर्शवली आहे.
पुढील शैक्षणिक वर्ष पुढे ढकलण्यात यावे का?
- 32 टक्के विद्यार्थ्यांना हे वर्ष पुढे सहा महिने ढकलण्यात यावे असं वाटत.
- तर 26 टक्के विद्यार्थी या विरोधात आहेत.
- तर 42 टक्के विद्यार्थ्यांनी याबाबत विचार केलेला नाही.
नोकरीसाठी या पदवीच्या उपयोगिता बाबत
- 37 टक्के विद्यार्थी सकारात्मक आहेत.
- 17 टक्के विद्यार्थी याबाबत नकारात्मक आहेत.
- तर 35 टक्के विद्यार्थ्यांनी याबाबत विचार केलेला नाही.