मुंबई :  आदित्य ठाकरेंचे (Aaditya Thackeray) निकटवर्तीय असलेल्या सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. कोराना काळातील खिचडी घोटाळाप्रकरणी ईडी कोठडीत असलेल्या सूरज चव्हाण यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने सूरज चव्हाण यांना आज मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात हजर केलं. त्यानंतर न्यायमूर्ती एम जी देशपांडे यांनी चव्हाणांना 7 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.


सूरज चव्हाण यांना जामीनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायमूर्ती एम जी देशपांडे यांनी आज सूरज चव्हाण यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. कोरोनाकाळातील खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाण आरोपी आहेत. आता पुन्हा एकदा सूरज चव्हाण यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली.


25 जानेवारीपर्यंत तपासयंत्रणेच्या ताब्यात ठेवण्याचे निर्देश


सूरज चव्हाणांना 17 जानेवारी रोजी ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर सूरज चव्हाणांना 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी सुनवण्यात आली होती.  पण आता  त्यांना 25 जानेवारीपर्यंत तपासयंत्रणेच्या ताब्यात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते.  त्यानंतर आज मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात त्यांना हजर करण्यात आले होते. आता कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 


52 कंपन्यांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट


कोरोना काळात स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी, ज्यांचे मुंबईत घर नाही अशा कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय त्यावेळच्या सरकारने घेतला होता. केंद्र सरकारनेही त्याला पाठिंबा दिला होता. मुंबई महापालिकेने एकूण 52 कंपन्यांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. सुरुवातीच्या चार महिन्याच्या काळात चार कोटी खिचडी पॅकेट्स वाटण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. या कामात घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचे नाव यामध्ये घेण्यात आलं होतं.  


आर्थिक व्यवहार होताना नियमांचं उल्लंघन?


ईडीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसकडून काही सब टेंडर देण्यात आले, ज्यामध्ये वैद्यकीय साहित्य आणि सेवा पुरवण्याचे सब टेंडर होते. असं टेंडरशी संबंध सुरज चव्हाण यांचा येतो, त्यामुळे या संपूर्ण कंत्राटामध्ये आर्थिक व्यवहार होताना नियमांचं उल्लंघन झालं का? यामध्ये कुठल्या प्रकारचा गैरव्यवहार करण्यात आला का? या सगळ्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे.


हे ही वाचा :


Sharad Pawar : ईडीच्या कारवाईचा धक्का की राष्ट्रवादीला राजकीय बुस्टर डोस? शरद पवारांप्रमाणे नातू रोहित पवार बाजी पलटवणार का? काय होता तो किस्सा?